दिघोडे गावात गॅलेक्सी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील दिघोडे गावात गॅलेक्सी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते .गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीकोणातून आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत दिघोडे तर्फे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोलाचे सहकार्य महेंद्र घरत अध्यक्ष जय माता दि ग्रुप, निलेश पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष जासई विभाग,कु. रोहण म्हात्रे, समाज सेवक कु. अभिषेक पाटील, कु.पंकज पाटील ह्यांचा मोलाचा वाटा होता.
कार्यक्रमाच्या शेवटी गॅलेक्सी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल च्या टीमला एक भेट वस्तू देवून त्याचे आभार मानण्यात आले.








Be First to Comment