कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी पोषण पोटली चे वाटप
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
अन्नदा संस्था मुंबई यांच्या तर्फे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी ११०० पोषण आहार किट (पोषण पोटली) चे वाटप करण्यात येणार आहे. कुपोषित बालकांचे वजन वाढण्यासाठी त्यांना उपयुक्त आहार या पोषण पोटली मध्ये आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण पोटली किट वाटण्यात येणार आहेत, हे किट मुंबई मधील अन्नदा संस्थेतर्फे देण्यात आली आहेत, आज दि.29 डिसेंबर रोजी नेरळ हद्दीतील 170 कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी कर्जत चे प्रांत अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख आणि नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश म्हसकर उपस्थित होते.








Be First to Comment