Press "Enter" to skip to content

आमदार निधीतून संस्कृतीक रंगमंचाचे काम

नवीन शेवा येथील भोईर आळी मित्र मंडळाच्या संस्कृतीक रंगमंचाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील नवीन शेवा या गावासाठी आपल्या आमदार निधीतून भोईर आळी मित्र मंडळाच्या संस्कृतीक रंगमंचाचे काम मंजूर केले होते. सदर रंगमंचाचे नवीन काम पूर्ण झाले असून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते या सांस्कृतिक रंगमंचाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या भव्यदिव्य कामासाठी एम आय पी एल चे व्यवस्थापक दयाळशेठ भोईर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच या भव्यदिव्य सांस्कृतिक रंगमंचाच्या उद्घाटन सोहळा वेळी उपातालुकाप्रमुख कमलाकर पाटील यांच्याकडून “गौरव महाराष्ट्राचा” या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांकडून माजी आमदार मनोहरशेठ भोईर, दयाळशेठ भोईर व कमलाकर पाटील यांचे आभार मानले.

यावेळी उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, सरपंच आदिनाथ भोईर, एम आय पी एल चे व्यवस्थापक दयाळशेठ भोईर, कामगार नेते गणेश घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख प्रकाश म्हात्रे, गावचे खजिनदार भारत भोईर, भोईर आळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते परशुराम ठाकूर, सतीश भोईर,जनार्धन भोईर, एकनाथ भोईर, हिराजी ठाकूर, मोरेश्वर भोईर, विजय म्हात्रे, नारायण भोईर, लहू पाटील, भालचंद्र भोईर, अजय सुतार, जगदीश भोईर, रोशन भोईर, भावेश भोईर, मिलिंद भोईर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.