जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील यांची उरणच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा : तहसीलदारांकडून समस्यां मार्गी लावण्याचे आश्वासन
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
रायगड जिल्हा इंटकच्या वतीने अध्यक्ष किरीट पाटील यांनी दिल्या उरण समस्यांचा पत्रावर तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उरण तहसील कार्यालय येथे आज बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी समस्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
सदर बैठकीत पीडब्ल्यूडी ,एन एम एम टी, वाहतूक पोलीस अधिकारी, उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, कोकण मच्छीमार संघाचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, माजी जिप सदस्य विनोद म्हात्रे, उरण तालुका इंटकचे अध्यक्ष संजय ठाकूर उपस्थित होते.
या बैठकीत फुंडे सिडको ऑफिस जवळील धोकादायक पुलाबाबत चर्चा करण्यात आली सदर पुल पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येत असताना निधीअभावी पीडब्ल्यूडी ने हा हा रस्ता सिडको कडे वर्ग करण्यात यावा व त्याचे काम सिडकोने करावे याबाबतचा प्रस्ताव सिडकोकडे पाठवल्याचे सांगण्यात आले .अनधिकृत पार्किंग बाबत त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे उरण शहरातील अनधिकृत पार्किंग व हाॅकर्स झोनबाबत नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. तसेच उरण शहरातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करण्याबाबत पोलीस खात्याला सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उरणच्या लाल मैदानावर गर्दुल्ल्यांच्या वावर बाबत त्वरित पोलीस खाते कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. जासई येथील होत असलेल्या पुलाच्या धोकादायक कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असलेले निदर्शनास आणून दिले, त्याचप्रमाणे त्याचे फोटोग्राफ्स दाखविण्यात आले. त्यावर त्वरित योग्य ती सुरक्षा व्यवस्था करून कोणतीही जीवितहानी होऊ नये याबाबत पावले उचलणे बाबत आश्वासित करण्यात आले.

उरण चारफाटा येथील रस्त्याचे काम करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत .सदर रस्ता हा चाणजे ग्रामपंचायत, पीडब्ल्यूडी, सिडको यांच्या अखत्यारीत येत असल्याकारणामुळे विविध खात्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. एनएमटी बस सेवा व एसटी सेवा यांना बोकडावीरा मार्गे वळविण्यात येण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. भेंडखळ ते द्रोणागिरी या मार्गावरील रस्त्यांवर गतिरोधक व लाईट व्यवस्था करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सर्वे करून गतिरोधक लावण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
खोपटा बायपास रोड त्वरित दुरुस्त करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गांच्या कमतरते बाबत ताबडतोबीने योग्य ते उपाय योजना करणे बाबत विनंती करण्यात आली आहे त्याच प्रमाणे शवगृहाची निर्मिती करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. सदर बाबत संबंधित खात्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडणे बाबत तहसीलदार यांनी आश्वासन दिले आहे.
उरणच्या विविध समस्यांबाबत संबंधित खात्याचे त्वरित चर्चा करून हे विषयी लवकरात लवकर सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदार
भाऊसाहेब अंधारे यांनी इंटक रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील यांना दिले आहे.








Be First to Comment