Press "Enter" to skip to content

प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुक

प्राथमिक शिक्षक पतपेढी उरणच्या निवडणुकीत सौ.शर्मिला महेंद्र गावंड भरघोस मतांनी विजयी

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

प्राथमिक शिक्षक पतपेढी उरणच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या रणधुमाळीत स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल विरुद्ध शिक्षक महाविकास आघाडी पॅनल अश्या दोन पॅनलच्या माध्यमातून एकूण ३० उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिगणात एकमेकांच्यां समोर उभे होते.

ह्या निवडणुकीत एकूण ६८० मतदाना पैकी ६२६ एवढं मतदान झालं त्यात स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश संपादन केले आणि या निवडणुकीत सर्वात जास्त मते स्वाभिमानी शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री महेंद्र गावंड यांच्या पत्नी सौ. शर्मिला महेंद्र गावंड यांनी मिळवून विजयश्रीची माळ गळ्यात घालत पहिल्यांदाच उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक पदावर विराजमान झाल्या आहेत.

शिक्षकांनींच शिक्षकांच्या उज्वल भविष्या करिता स्थापन केलेली पतपेढी ही त्यांना कठीण वेळप्रसंगी हक्काची कर्जपुरवठा करणारी संस्था असल्यामुळे ह्या संस्थेच्या जास्तीच जास्त कर्जपुरवठा आणि कमी व्याजदर करण्याचा मानस ह्या पॅनल चा आहे, त्या निवडणुकीची रणधुमाळी देखील तितकीच चुरशुची झाली शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्याचे काम मा. सुभाष भोपी सर यांच्या कडून होत असते त्या मुळे या निवडणुकीत बाजी मारली ती स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलच्या उमेदवारांनी.आणि ह्या पॅनलच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते पनवेल तालुका अध्यक्ष आणि पॅनल प्रमुख श्री शुभाष भोपी सर उरण पॅनलचे प्रमुख नरेश मोकाशी जयदास घरत,गंगाधर पाटील, निर्भय म्हात्रे,बबन पाटील सर ,बळीराम पाटील,विश्वनाथ पाटील,राज कडू सर, म.का.म्हात्रे सर, भ.तु.पाटील सर या सर्व मंडळींनी खूप मेहनत घेत या विजयात मोलाचं योगदान दिले.

निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेशजी सुर्वे,राजेश जाधव सर , महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष राजा म्हात्रे सर , पेण पतपेढी चे माजी चेअरमन मा.विजय पवार सर ,पेण पतपेढीच्या संचालिका व माजी चेअरमन जयश्री म्हात्रे, पेण पतपेढी चेअरमन श्री करंजीकर सर, संचालिका रश्मी म्हात्रे यांनी या सर्व विजयी उमेदवांचे मनःपूर्वक स्वागत करत अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचाली करिता खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.