Press "Enter" to skip to content

उरण पतपेढीच्या निवडणुकीत रमणिक म्हात्रे यांचा दणदणीत विजय

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीत जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रमणिक म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

यावेळी स्वाभिमान शिक्षक मित्र पॅनल यामध्ये सामिल होवून जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेला रमणिक म्हात्रेंच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती.यावेळी स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलने विरोधी पॅनल चा धुव्वा उडविला .

सदर निवडणूक स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनल ने प्रतिष्ठेची केली होती.या प्रसंगी स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनलचे प्रमुख सुभाष भोपी ,नरेश मोकाशी , जयदास घरत यांनी खुप मेहनत घेतली.त्या सोबत निर्भय म्हात्रे,बबन पाटील , महेंद्र गावंड, बळीराम पाटील,के.आर.म्हात्रे,हि.सो.म्हात्रे,बी.जे.म्हात्रे,प्रितम वर्तक , विश्वनाथ पाटील , राजाराम कडू,वि.रा.पाटील, साईनाथ गावंड,सुगिंद्र म्हात्रे,अनिल पाटील , सुविद्धा म्हात्रे , वैष्णवी पाटील , रविंद्र कोळी,भरत पाटील , नितीन गायकवाड, संगिता पाटील,उषा मोकळ,कोळी मॅडम,लाखन पाटील यांनी मेहनत घेतली.

त्याच बरोबर उरण तालुक्यातील शर्मिला गावंड अविनाश कोळी व संदीप पाटील हे शिलेदार निवडणून आले यावेळी जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष विजय पाटील , सरचिटणीस संदीप परब , शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे , शिक्षक संघ शिवाजी गट रायगड अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे ,राजेश जाधव,वैभव कांबळे ,उमेश विचारे, अनिल नागोटकर,भगवान घरत ह्या शिक्षक नेत्यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे हार्दिक अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.