Press "Enter" to skip to content

उरण तालुका युवा आगरी सेना प्रमुखपदी देवेंद्र तांडेल

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, आगरी सेना नेते प्रदीप साळवी, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी यांच्या आदेशानुसार आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणी व रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील देवेंद्र वसंत तांडेल यांची उरण तालुका युवा आगरी सेना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देवेंद्र तांडेल यांनी याबद्दल आगरी सेनेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे .आगरी सेनेच्या ध्येय धोरणानुसार समाजाला न्याय हक्कांची जाणीव करून देऊन ते मिळवून देण्याकरिता आपण आगरी सेनेचे कार्य प्रामाणिकपणे, निष्ठेने करणार असल्याचे व उरण तालुका विभागात युवा आगरी सेना मजबूत करणे आपले प्रमुख ध्येय असल्याचे नवनियुक्त उरण तालुका युवा आगरी सेना प्रमुख देवेंद्र तांडेल यांनी सांगितले. देवेंद्र तांडेल यांची उरण तालुका युवा आगरी सेना प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.