स्वराज्य ग्रुप खोपटे -उरण व आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
स्वराज्य ग्रुप खोपटे -उरण व आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिर खोपटे सभागृह (उरण )येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.

यावेळी स्वराज्य ग्रुप खोपटेचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष हेमंत ठाकूर,ग्रूप ग्राम पंचायत बांधपाडा खोपटे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील,ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, कामगार नेते रवी घरत, भाजपा तालुकाध्यक्ष रवि भोईर,ग्रामस्थ मंडळाचे सचिव कुमार ठाकूर, विष्णू पाटील,ग्रामपंचायत बांधपाडाचे सदस्य, प्रशांत भाऊ मित्र परिवार,स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी सदस्य,ग्रामस्थ मंडळ खोपटेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक यांनी केले.
या अगोदर ही स्वराज्य ग्रूप खोपटेच्या माध्यमातून गावातील तलावाची साफसफाई, गावातील स्मशान भूमी, रस्ते सफाई, वादळात पडलेल्या बस स्टॉप चे नव्याने बांधकाम, तसेच कोविड काळात विभागातील गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच दोन वर्षा पूर्वी गावात असेच एक डोळ्यांचे शिबिर स्वराज्य ग्रूपच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. त्यात जवळ पास ४०० नागरिकांची तपासणी व गावातील ९३ तसेच इतर गावातील ७ असे एकूण १०० जन्नांचे डोळ्यांचे वीणा मूल्य ऑपरेशन करण्यात आले होते.
– प्रशांत ठाकूर
अध्यक्ष स्वराज्य ग्रुप, खोपटे








Be First to Comment