पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते रांजणपाडा – जासई येथील स्मशानभूमीचे भूमिपूजन
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
रांजणपाडा- जासई येथील नविन स्मशान भूमीचे भूमिपूजन आज पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जेएनपीटीला जोडलेली रेल्वेलाईनचे चौपदीकरणाचे काम सुरू असल्याने रांजणपाडा येथिल जुनी स्मशानभूमी आड येत होती. त्यामुळे नविन स्मशानभूमी टाटा कंपनीने बांधून देण्याचे मान्य केले होते. त्याचे भूमिपूजन आज पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

यावेळी जासई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धिरज घरत, उरण तालुका शेकाप युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, एकनाथ घरत, रुपाली पाटील, पूजा कांबळे, मुरलीधर ठाकुर, रमेश पाटील, प्रकाश पाटील, नारायण घरत, सुरेश पाटील, महादेव पाटील, सुदर्शन पाटील, मिथून म्हात्रे, ममता म्हात्रे, चंद्रकांत नाईक, शाम पाटील, संतोष ठाकुर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.








Be First to Comment