घारापुरी बेटावर येणाऱ्या पर्यटकांना मिळणार चांगल्या सुविधा, ग्रामस्थांना मिळणार रोजगार
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील घारापुरी येथील भारतीय पुरातत्त्व विभाग कार्यालयात ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी मागणी केल्याप्रमाणे सागरी पोलीस ठाणे मोरा येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश मोहीते यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरीटाईम बोर्ड,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्त्व विभाग, गेटवे एलिफंटा जल वहातुक संस्था,लोकल गाईड,हाॅटेल व्यवसायिक व व्यवसायीक यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली.
कोरोना काळात दिड वर्ष पर्यटकबंदीमुळे घारापुरी बेटावरील रोजगार ठप्प झाला होता.मात्र दोन महिन्यांपासून बेटावर पर्यटक सुरू झाल्याने बेटावरील रोजगार सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
घारापुरी हे जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ असल्याने बेटावर लाखो देशी-विदेशी पर्यटक वर्षाकाठी येत असतात. तसेच ख्रिसमस तसेच सरत्या वर्षात येणाऱ्या सुट्ट्यांचे काळात बेटावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.त्यामुळे अशावेळी बेटावर पर्यटकांची गर्दी उसळल्यास पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता सुरळीतपणे बेटावर पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल या उद्देशाने तसेच ग्रामस्थांना रोजगारास प्राधान्य निर्माण होईल या उद्देशाने ग्रामपंचायतीचे वतीने सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे मोरा पोलीस ठाणे यांचेकडे मागणी केली होती.

त्याप्रमाणे खेळी मेळीच्या वातावरण ही मिटींग संपन्न झाली.मिटींगमध्ये पर्यटकांना सर्वतो परी सेवा पुरविणाऱ्या विभागांनी सेवा भावे काम करणार असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले.
यावेळी मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहीते.मेरीटाईम बोर्डाचे सहा.बंदर निरिक्षक संजय पिंपळे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे सहा.लेखाधिकारी विकास शिंदे,एसआयएस सिक्युरिटी चे अजय मिश्रा,गेट वे जल वहातुक संस्थेचे प्रतिनिधी रईस,जेष्ठ हाॅटेल व्यवसायिक यशवंत म्हात्रे, शेखर पडते, संतोष कोळी, ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, सदस्य मंगेश आवटे, मुकेश भोईर तसेच पोलीस सहकारी व लोकल गाईड उपस्थित होते.








Be First to Comment