Press "Enter" to skip to content

मोहोपाडा येथे श्री दत्त जयंती सोहळा हरिनामाच्या गजरात साजरा

सिटी बेल | रसायनी |

मोहोपाडा व शिवनगर ग्रामस्थांचे बाजारपेठेत असणा-या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन साध्या पध्दतीने करण्यात आले होते.

पहाटे काकड आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील महिला वर्गाने समान वेश परिधान केला होता.यानंतर सकाळी श्री दत्तमुर्ती अभिषेक व पुजेचा मान गावचे यजमान पत्रकार राकेश खराडे व रसिका खराडे यांच्याहस्ते पार पडला.यानंतर ग्रामस्थांच्यावतीने ज्ञानेश्वरी पारायण होवून श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.तसेच सुप्रसिद्ध तबलावादक किशोर लोहार यांच्या तबलावादक भजनाचा कार्यक्रमाची उपस्थित भाविकांनी वाहवा केली.

यानंतर श्री दत्त जन्माचे किर्तन हभप.वामन महाराज भोईर यांनी केले.यानंतर हरीपाठ आणि दतगुरूंच्या पालखीची मिरवणूक श्री दत्त मंदिरातून मोहोपाडा गाव तेथून पुन्हा श्री दत्त मंदिर अशी काढण्यात आली.या मिरवणुकीत लहानथोर,मोहोपाडा ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.

दरम्यान मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिर बाजारपेठेत असल्याने दर्शंनासाठी भाविकांची रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.यावेळी शासकीय नियमांचे पालनही करण्यात आल्याचे दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.