Press "Enter" to skip to content

जेष्ठ डॉक्टरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’

कर्जत मेडिकल असोसिएशनची वार्षिक शैक्षणिक परिषद संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक शैक्षणिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तीन जेष्ठ डॉक्टरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

कर्जत – चौक रस्त्यावर असलेल्या हॉटेल राज कॉटेज मध्ये कर्जत मेडिकल असोसिएशनची वार्षिक शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सायन हॉस्पिटल चे फोरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. मुकेश ओसवाल उपाध्यक्ष डॉ. आशिष कर्वे, सचिव डॉ. मनीष जैन, सह सचिव डॉ. आदित्य जंगम, खजिनदार डॉ. मनीष परमार, सहखजिनदार डॉ. समीर मनगोळी, डॉ. प्रशांत गांगल व डॉ. कुमार ओसवाल आदी उपस्थित होते.

या परिषदेमध्ये डॉ. नीलकंठ फडके, डॉ. प्रेमचंद जैन व डॉ. रामभाऊ साबळे या जेष्ठ डॉक्टरांना त्यांनी आजपर्यंत दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या परिषदेमध्ये डॉ. एस व्ही कुलकर्णी, डॉ. अमित लंगोटे, डॉ. अमित कपूर, डॉ. सचिन मुरडे, डॉ. देवदत्त दाभोळकर या तज्ञ डॉक्टरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. शर्वाणी कुलकर्णी, डॉ. साजिद अधिकारी, डॉ. शीतल कराळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. मनीष परमार यांनी केले. या परिषदेला डॉ. भरत लाड, डॉ. सुहास शितूत, डॉ. श्रीकांत डहाके, डॉ. मनोहर साबणे, डॉ. हेमंत गंगोलिया, डॉ. आशुतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.