Press "Enter" to skip to content

इंटकने फोडली समस्यांना वाचा

उरण तालुका व शहरातील विविध समस्यांबाबत तहसीलदारांना रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील यांनी दिले निवेदन

सिटी बेल | उरण |

उरण तालुका व उरण शहरातील विविध समस्यांबाबत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना रायगड जिल्हा इंटकच्या वतीने रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील यांनी निवेदन दिले व तातडीने या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित खात्याची बैठक घेऊन यावर योग्य तो उपाय योजना कराव्यात याबाबत मागणी केली अन्यथा आंदोलन भूमिका घेण्यात येईल असे या पत्राद्वारे त्यांना कळविण्यात आले आहे.

यावेळी तहसीलदारांनी किरीट पाटील यांना आश्वासित केले की, लवकरच संबंधित खात्याची बैठक घेऊन या समस्यांवर उपाययोजना करण्यात येतील आणि सदर बैठकीस आपल शिष्टमंडळ बोलाविण्यात येईल.

सदर वेळी रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा इंटकचे सरचिटणीस विवेक म्हात्रे, रायगड युवा इंटकचे श्री लंकेश ठाकूर, काँग्रेसचे युवा नेते सुजित म्हात्रे इंटक चे युवा नेते आदित्य घरत हे उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

1) उरण पनवेल रोडवरील फुंडे गावाजवळील धोकादायक पुलावरील रहदारी त्वरित थांबवण्यात यावी. सदर पुलाचे काम तातडीने करण्यात यावे.

2) बोकडविरा चार फाटा ते डोंगरी हा रस्ता मागील पूल बंद करण्यात आला होता तो तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावा.

3) उरण ते भेंडखळ या मार्गावरील काही भागात पथदिवे व गतिरोधक नसल्यामुळे तेथे अपघात होऊन जिवितहानी झाली आहे ते लावण्यास संबंधित खात्याला आदेश देण्यात यावे.

4) खोपटापुल ते पंजाब कोनवेयर यामधील बायपास मार्ग अतिशय खराब व दुरावस्थेत आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे.

5) जासई येथील सुरू असलेल्या पुलाचे काम अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू आहे. यापूर्वी तेथे दुर्घटना घडल होती त्यांत जीवितहानी देखील झाली होती त्यानंतर देखील त्याच पद्धतीत या पुलाचे काम सुरू आहे. त्य पुलाखालून रहदारी सुरू आहे ती अतिशय धोकादायक बाब आहे. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी.

6) द्रोणागिरी मार्गे खोपटा पुला vec hs जाणारा बायपास रोड हा खचला आहे त्यामुळे रस्ता वर खाली व खड झाल्यामुळे तिथे अपघात घडण्याची शक्यता आहे तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा.

7) फुंडे येथील सिडको ऑफिस जवळील पुल धोकादायक असल्याकारणाने तेथून एसटी व एनएमएमटी बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे व ती वाहतूक द्रोणागिरी मार्गे भेंडखल मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाणजे, डोंगरी, फुंडे, एम. एस. ई.बी. व बोकडविरा येथील नागरिकांना व कामगारांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरून जड वाहतूक कोणत्याही बंधनाशिवाय सुरू आहे. त्यावर कोणते बंधन घालण्यात आले नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की एस टी. व एन. एम. एम. टी. बस सेवा ही बोकडविरा मार्गे एम एस.ई.बी. मार्गे एम.एस.ई.बी. टरबाइन मार्गे वळविण्यात यावी.

8) उरण तालुक्यात विविध भागात होत असलेल्या अनधिकृत पार्किंग व तातडीने बंदी घालून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यामुळे अनेक अपघात होत असतात.

9) उरण शहरातील हॉकर्स झोन बाबत तातडीने निर्णय घ्यावा अनधिकृत पार्किंग वर कार्यवाही करण्यात यावी.

10) लाल मैदान येथे होत असलेल्या अनधिकृत पार्किंग तातडीने बंद करण्यात यावी. रात्रीच्या वेळी येथे गर्दुल्यांच्या त्रास येथील नागरिकांना होत आहे त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. हे ग्राउंड खेळा उपयोगी तयार करण्यात यावे

11) उरण चार फाटा येथील रस्त्याची दुरुस्ती करून करण्यात यावे.

12) उरण तालुक्यातील केलेला रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांचे तातडीने सर्वे करण्यात यावे व ते दुरुस्त करण्यात यावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.

13) उरण तालुका हा अतिशय महत्त्वाचा तालुका आहे या तालुक्यात अनेक राज्य सरकार व केंद्र सरकारची व खाजगी उद्योगधंदे आहेत परंतु सदर तालुक्यात योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नाही. उरण तालुक्यातील सरकारी दवाखान्यात पूर्ण क्षमतेने वैद्यकीय अधिकारी व स्टाफ उपलब्ध नाही त्याच प्रमाणे तेथील सुविधा या योग्य पद्धतीचे नाहीत. सदर ठिकाणी पोस्टमार्टम रूम हा अतिशय लहान आहे व तेथे ठेवण्याची सुविधादेखील नाही त्यामुळे अनेक वेळा शव हे नातेवाईकांना बाहेरच्या ठेवावे लागतात ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीने त्वरित सकारात्मक उपाय योजना झाल्या पाहिजेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.