Press "Enter" to skip to content

खिडुकपाडा येथे दत्तजयंती उत्साहात साजरी

सामाजिक उपक्रम आणि दत्तसेवा याद्वारे झाली दत्तजयंती साजरी : प्रभुदास भोईर यांचे अप्रतिम आयोजन

सिटी बेल | पनवेल |

शेतकरी कामगार पक्षाचे वाहातुक सेल चे महाराष्ट्र अध्यक्ष तथा महाराष्ट्र माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या वतीने खिडुकपाडा येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.त्यांनी उभारलेल्या मंदिरात दत्तजयंती उत्सव गेली २० वर्षे अखंडित पणे साजरा होत आहे. त्या निमित्ताने येथे प्रतिवर्षी मोठी जत्रा भरते. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाविषाणू चे सावट असल्याकारणाने मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

सोहळ्याची सुरुवात भल्या पहाटे अभिषेक व श्री दत्त पूजनाने झाली. दिवसभर मुख्य मंडपामध्ये भजन सेवेच्या द्वारे दत्तभक्तांना सांगीतिक भजनाची पर्वणी दिली गेली. प्राप्त परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधांची असलेली गरज लक्षात घेता प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय शिबीर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी नाशिकचे ह भ प भागवताचार्य भागीरथ महाराज काळे यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थित दत्त भक्तांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.

कामोठे येथील डॉक्टर रुपेश वडगावकर यांचे साई समर्थ हॉस्पिटल यांच्यावतीने उपस्थित भक्तमंडळीसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये,रक्तदाब,मधुमेह,कोलेस्ट्रॉल,अस्थिव्यंग,दमा आदी विकारांच्या विनामूल्य चाचण्या तसेच तज्ञ सल्ला व औषधे प्रदान करण्यात आली. या बरोबरीनेच भव्य असे रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.

आमदार बाळाराम पाटील, पनवेल उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील,नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक विकास घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,माजी उपमहापौर जगदीश गायकवाड,माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, कळंबोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, नगरसेविका कमल कदम, नगरसेविका सारिका अतुल भगत, युवा नेते अतुल भगत,एस पी मोरे फाऊंडेशनचे सतीश मोरे, शिवकर चे सरपंच अनिल ढवळे, सरस्वती ताई काथारा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती एस के नाईक, संचालक राम भोईर, संचालक संतोष कृष्णा पाटील, संचालक मोहन कडू, आदई ग्रामपंचायतीचे सरपंच तथा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमाकांत गरुडे, रायगड एकता श्रमिक संघटनेचे सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, रा जी प माजी उपाध्यक्ष नारायण शेठ ठाकूर, भाजपाचे ओबीसी सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष एकनाथ देशकर, उद्योगपती शैलेश माळी, विनोद पाटील, आणि महाराष्ट्र माथाडी अँड जनरल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर आदी मान्यवर यांच्यासह हजारो दत्त भक्तांनी दर्शन घेतले.

श्री दत्त जयंती सोहळा निमित्त आलेल्या मान्यवरांचे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोइर, शेकाप वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे,गणेश भोईर,प्रभाकर उलवेकर,गुरुनाथ ठाकूर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी प्रभुदास भोईर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या शेकाप वाहतूक संघटनेचे तसेच महाराष्ट्र माथाडी अँड जनरल कामगार संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.