Press "Enter" to skip to content

हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक 

सिटी बेल | नवी मुंबई |

हद्दपारीची मुदत संपली नसताना तुर्भे येथील पावणे भागात परतलेल्या एका सराईत गुन्हेगाराला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. करण उर्फ हरी दिलीप गायकवाड (23) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पाहता परिमंडळ-1 च्या पोलीस उपआयुक्तांनी त्याला 16 ऑक्टोबर 2021 मध्ये ठाणे, रायगड, नवी मुंबई व मुंबई या भागातून एक वर्षासाठी हद्दपार केले हेते. 

तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाकडून ऑल ऑऊट ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस ठाणे हद्दीतील हिस्ट्रीशिटर, गुंड तसेच पाहिजे आरोपी, फरार आरोपी, माहितगार आरोपींची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती. सदरचे पथक रात्री 11. 30  वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना, पावणे येथील श्रमिकनगर मधील बिल्डींगच्या बाजुच्या मैदानातून एक तरुण पोलिसांना पाहून पळून जाताना निदर्शनास आला.  त्यामुळे पोलिसांनी त्याची धरपकड करुन त्याच्याकडे चौकशी केली असता, सदर तरुण हा करण उर्फ हरी दिलीप गायकवाड असल्याचे तसेच तो तुर्भे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार  असल्याचे आढळून आले.

तसेच परिमंडळ-1 च्या पोलीस उपआयुक्तांनी त्याला 16 ऑक्टोबर 2021 मध्ये 1 वर्षासाठी ठाणे, रायगड, नवी मुंबई व मुंबई या जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केल्याचे तसेच त्याच्या हद्दपारीची मुदत संपली नसताना, तो कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हद्दीत परतल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी करण उर्फ हरी दिलीप गायकवाड याच्या विरोधात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.