Press "Enter" to skip to content

उरण तहसीलदारांना निवेदन

सक्तीच्या वॅक्सीन घेण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी निदर्शने

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

माननीय सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाने वॅक्सीन घेणे देशातील कोणत्याही नागरिकांना सक्तीचे नाही याबाबत अफिडीव्हेट दिले आहे. तसेच मणिपूर, कर्नाटक, गुजरात व राजस्थान येथील माननीय उच्च न्यायालयाने वॅक्सीन सक्ती संदर्भात वॅक्सीन सक्तीचे केले जाऊ शकत नाही. सक्ती करणे भारतीय संविधान कलम 14,19 व 21 चे उल्लंघन आहे. असे निकाल दिले आहे. असे असताना महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांनी कर्मचारी, कामगार, मजूर यांना वॅक्सीन(लस /औषध )घेणे सक्तीचे केले आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ  राज्य शाखा  व मुख्य शाखेच्या उपशाखा व इतर कर्मचाऱ्यांच्या संघटना हे एकत्र येऊन दिनांक 20/12/2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी दुपारी 12:30 ते 3:30 या वेळेत निदर्शने करणार आहेत.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष घरत, जिल्हा संयोजक गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टात टी. जे. भानू विरुद्ध राज्य पीआयएल(एल )क्रमांक 11473 च्या 2021 प्रकरणाच्या सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान 13 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की कोणतीही व्यक्ती मानसिक दृष्ट्या सक्षम असली तरीही सरकार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संमती शिवाय लस देऊ शकत नाही. आणि व्यक्ती जर मानसिक दृष्ट्या अक्षम असेल तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा डॉक्टरांची संमती लसीकरणासाठी आवश्यक आहे. कोणतेही सरकार त्या व्यक्तीच्या संमती शिवाय लस देऊ शकत नाही. तथा कोणतेही औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून वॅक्सीन घेणे सक्तीचे केले जात असल्याने व सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा सुविधा पासून वंचित ठेवत असल्याने सदर शासनाविरोधात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष संतोष घरत, जिल्हा संयोजक गणेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा प्रकाश शरणागत यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.