सिटी बेल | उरण |
आकाश फाऊंडेशन मुंबई च्या सेक्रेटरी सौ संजीवनी ताई शृंगारे यांनी सारडे विकास मंच ला दिलेल्या गरजेच्या वस्तु आज शासकीय माध्यमिक आश्रम शाळा साई ला सुपुर्द करण्यात आल्या.
यात बेड, बेडशीट ,उश्या, नैपकीन, टॉवेल ,सॉक्स ,रूमफ्रेशनर जेवणासाठी सतरंजी,गणपती बापा, इस्त्री, इअरफ्रेशनर, थर्मामिटर, ऑक्सीमीटर,आज देण्यात आले. यासाठी आकाश फाऊंडेशन मुंबई च्या सेक्रेटरी सौ संजीवनी ताई शृंगारे ,करिश्मा खन्ना ,जय अंबे नवरात्रोउत्सव मंडळ पाले चे हरीश म्हात्रे,चेतन पाटील, संतोष म्हात्रे, सारडे विकास मंच कार्याध्यक्ष रोहित पाटील, त्रिजन पाटील, मंगेश पाटील,कैलास पाटील त्यांच्या सहकार्याने शासकिय माध्यमिक आश्रम शाळा साई ला ही भेट देण्यात आली.

यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी जी पाटील यांनी आकाश फाऊंडेशन च्या संजिवनी ताई श्रुंगारे सोबत सारडे विकास मंच चे आभार व्यक्त केले.








Be First to Comment