Press "Enter" to skip to content

शिवसेनेचे उरण पोलीसांना निवेदन

महापौर किशोरी पेडणेकर धमकी प्रकरणी भाजपाचा हात असल्याचा उरण शिवसेना नेत्यांचा आरोप

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मुंबईच्या महापौर तथा महिला आघाडी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरीताई पेडणेकर यांना उरण मधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. यासंदर्भात उरण शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी या घटनेचा जाहीर निषेध करून यामध्ये भाजपाचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी यावेळी केला. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी उरण शिवसेनेतर्फे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच लवकरच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उरणमध्ये घेणार आहोत. त्यावेळी त्यांच्या केसांनाही धक्का लावून दाखवावा असे जाहीर आवाहनही उरण शिवसेनेने केले आहे.

यावेळी माजीआमदार मनोहरशेठ भोईर, महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी प्रखर शब्दात आपले मत व्यक्त करताना ज्या अज्ञात इसमाने हे कृत्य केलेला आहे त्याचा निषेध केला.

मुबंई महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीच्या पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर हे पत्र पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

काल रात्री भायखला पोलिसांनी याची दखल घेऊन उरणमधील सायबर कॅफेची चौकशी केली आहे. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकी पत्राची दखल घेऊन उरण शिवसेनेतर्फे आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. सदर निषेध मोर्चा उरण शिवसेना शहर शाखा येथून काढण्यात आला. उरण पोलीस ठाणे येथे याचा उपस्थितांनी जाहीर निषेध करून यामध्ये भाजपाचा हात असल्याचा आरोप उपस्थित शिवसेना नेत्यांनी मार्गदर्शन करताना केला.

याप्रकरणाचा छडा काही दिवसांत लागला नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही दिला. तसेच लवकरच उरणमध्ये भव्यदिव्य असा कार्यक्रम महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार आहे. त्यावेळी अशा पोकळ धमकी देणाऱ्याने त्यांच्या केसाला तरी धक्का लावून दाखवावा असे आवाहन शिवसेना नेत्यांनी केले.

यावेळी विधानसभासंपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकासंपर्कप्रमुख जे.पी.म्हात्रे, तालुकासंघटक, बी.एन.डाकी, गटनेते गणेश शिंदे, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, वैद्यकीय कक्ष रमेश म्हात्रे, उपतालुका संघटक के.एम. घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपजिल्हासंघटीका ममता पाटिल, विधानसभा संपर्कप्रमुख ज्योति म्हात्रे, विधानसभा संपर्कप्रमुख कल्पना पाटील, तालुका संपर्कप्रमुख प्रणिता म्हात्रे, वसुधा म्हात्रे, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे, श्रद्धा सावंत आदिंसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.