माथेरान मधिल भाजप मध्ये गेलेल्या दहा पैकी तिन नगसेविका पुन्हा शिवसेनेत
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
माथेरान नगरपरिषदे मधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीत मध्ये प्रवेश केला होता,त्यामधील तीन नगरसेविका पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्या आहेत.
27 डिसेंबर 2020 रोजी माथेरान मधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा मध्ये प्रवेश केला होता त्यामधील सोनम दाबेकर, ज्योती सोनावणे आणि सुषमा जाधव यांनी पुन्हा शिवसेना प्रवेश केला आहे, आणि गेलेले काही नगरसेवक पुन्हा शिवसेनाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप ला मोठा धक्का बसला आहे.

हा पक्ष प्रवेश युना सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशा वरून तसेच खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित झाला यावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी मयुर जोशी, युवा संपर्क प्रमुख ओंकार चव्हाण, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, गट नेते प्रसाद सावंत, माजी नगसेवक कुलदीप जाधव, सचिन दाबेकर उपस्थितीत होते.
तिन नगसेविका परत शिवसेना प्रवेशाने आगामी निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार अजून माथेरान नगपालिकेवर पुन्हा भगवा फङकेल असा विश्वास संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी यावेळी व्यक्तकेला आहे.











Be First to Comment