सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर राज्य नाट्य स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिनाऱ्या उरण तालुक्यातील कलाकारांनी आपले २ फोटो व (नाव, वय, उंची, ठिकाण , सम्पर्क क्रमांक , अभिनय अनुभव/ फ्रेशर) वैयक्तिक माहिती गौरी देशपांडे यांना
9820690812 या क्रमांकावर व्हॉट्स अँप करावी.
आपला फोटो भूमिकेसाठी योग्य वाटल्यास आपणांस औडिशन कॉल करण्यात येईल
नोंद : सरावासाठी वेळ देण्याची तयारी असावी
आपल्याला खालील वया प्रमाणे स्त्री आणि पुरुष कलाकार लागणार आहेत.
१. स्त्री ….वय ४५ एकुण-२
२. स्त्री (मोलकरीण)..वय ३५
३. पुरुष…वय ४५-५० एकुण-२(ह्यात एक पारशी वाटला पाहीजे)
४. पुरुष..वय ३०
५. स्त्री …वय २८
औडिशन ला येताना १ ते दीड मिनिटांचा प्रवेश सादर करण्याची तयारी करून येणे.करोना प्रार्दुभाव होऊ नये या साठी सुरक्षितता नियमाचे पालन करावे.रविवार दि १२ डिसेंम्बर २०२१ रोजी औडिशन दुपारी ३ वा. रुचिरा फार्म, मोठे नागाव, उरण येथे घेण्यात येईल.कृपया पात्रांसाठी नमूद वय असणाऱ्या कलाकारांनीच सम्पर्क साधावा.उपलब्ध फोटो मधून निवडलेल्या कलाकारांना ठिकाण कळवले जाईल असे सदर नाट्य स्पर्धेसाठी नियम असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन,उरणचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.








Be First to Comment