हल्ला पूर्वनियोजित : पोलीसांना पुर्वकल्पना असुनही पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
पहा जितेंद्र म्हात्रे सांगत आहेत या हद्ययाचा थरकाप उडवणार्या हल्ल्याची कहाणी 👇
सिटी बेल | उलवे |
पनवेल तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या न्हावे गावात देखील आता अंडरवर्ल्डचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. खंडणी साठी धमकावणे, प्राणघातक हल्ला करणे असे प्रकार याठिकाणी घडू लागले आहेत आणि ते देखील निव्वळ पोलीसांच्या दुर्लक्षपणामुळे !
काल रात्री असाचं एक खळबळजनक प्रकार न्हावे गावात घडला आणि तो देखील व्हावे गावातील वजनदार व्यक्तीमत्व, गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रें यांच्या बाबतीत. काल रात्री ८ वाजण्याच्या आसपास शेकापचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रेंवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उलवे नोड येथील मिलेनियम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
जखमी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात पत्रकारांनी भेट घेतल्यावर त्यांनी “माझ्यावर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला होणार हे पोलीसांना माहीती असुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले” असे धक्कादायक आरोप केले आहेत. न्हावे गावात गुंडाराज सुरु असल्याचा आरोप करीत त्यांनी हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. या प्रकरणाची नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.
डोक्यावरचा वार हाताने अडवल्याने जीव वाचला
हल्ला करण्यापूर्वी जितेंद्र म्हात्रे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.परंतु तो वार म्हात्रे यांनी हाताने अडविल्याने त्यांचा जीव वाचला. जितेंद्र म्हात्रे यांनी हल्ला करणाऱ्यांचा नावानिशी उल्लेख केला. हल्लेखोरांचे नाव घेऊन जितेंद्र म्हात्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांसमोर ठेवला. हा हल्ला विक्रांत जयवंत भोईर, राकेश पाटील, गौतम गायकवाड आणि आणखी दोघे- तिघे असल्याचे जितेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
या हल्ल्याची बातमी समजताच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींनी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
विक्रांत भोईर याने अनधिकृत पे पार्किंग सुरू केली आहे. मी सरपंच असे पर्यंत त्याला ही पार्किंग सुरू करता आली नाही.परंतु मी राजीनामा दिल्यानंतर त्याने ही अनधिकृत पे पार्किंग सुरू केली होती.मी त्याला आक्षेप घेतला होता. याच वादातून माझ्यावर हा हल्ला झाला. मला ठार मारण्याचाच या गुंडांचा इरादा होता. माझ्यावर हल्ला करणार्या गुंडांनी नुकतेच जेएनपीटी च्या एका कंत्राटदाराला देखील खंडणीसाठी धमकावल्याची तक्रार देखील दाखल आहे. – जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच न्हावा








Be First to Comment