Press "Enter" to skip to content

जासई येथे पेट्रोल पंपाचे उद्घाटन

तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसायाकडे वळावे – आमदार जयंत पाटील

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे या भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय क्षेत्रात वळणे ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी जासई येथे पेट्रोल पंपाच्या उदघाटन प्रसंगी केले.

जासई ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत व गुरुनाथ घरत यांच्या नवीन एस. आर. ब्रदर्स ऑटोमोबाईल भारत पेट्रोल पंपाचे उदघाटन आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, न्हावा सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, पंस सदस्य वैशाली पाटील, नरेश घरत, रमाकांत म्हात्रे, धनाजी ठाकूर, मनोहर पाटील, सुरेश पाटील, निलेश म्हात्रे, रघुशेठ घरत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उरण परिसराला वेगळा इतिहास आहे. त्यात उरणचा विकास झपाट्याने होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांनी नोकरीच्या मागे न लागता अत्याधुनिक व्यवसाय क्षेत्रात उतरणे ही काळाजी गरज बनली आहे. तरुणांनी व्यवसाय केला तर स्थानिकांचे व्यवसायात प्राबल्य राहील असे सांगत आमदार जयंत पाटील यांनी पेट्रोल पंपावर संतोष घरत यांनी महिलांना ५०% प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

पेट्रोल पंपाचे मालक संतोष घरत यांनीही याप्रसंगी मी ही काही वर्षे नोकरी व्यवसायात उतरल्याने प्रगती करू शकलो. तरी स्थानिक तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी. कारण नोकरीचीही आता शाश्वती राहिलेली नसल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.