Press "Enter" to skip to content

उरणमध्ये 623 जणांना मोफत कोविड लसीकरण

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

कोरोनाच्या येणार्‍या तिसर्‍या लाटेपासून उरणच्या जनतेचे संरक्षण करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय उरण, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन तसेच नवपरिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड -19 लसीकरण करण्यात आले. यावेळी दिवसभरात 623 जणांचे लसीकरण करण्यात आले. उरणमध्ये अशा प्रकारे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण मोहीम यशस्वी झाली.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. गेली 2 वर्षे जनता त्रास सहन करीत आली आहे. तसेच यातून सुटका होण्यासाठी भर नाक्यावर मोफत लसीकरण असल्याने लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सदर लसीकरण उरण चारफाटा येथील रमेश रेऐडेन्सी टॉवर येथे रविवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले होते. याचा फायदा 623 जणांनी घेत लसीकरण केले.

याप्रसंगी मुख्याधिकारी संतोष माळी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. देसाई, डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, डॉ. सुरेश पाटील, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, काँग्रेस मच्छीमार नेते मार्तंड नाखवा, नवपरिवर्तन संस्थेचे पत्रकार विरेश मोडखरकर, घन:श्याम कडू, आशिष घरत, किशोर पाटील, कुणाल सिसोदिया, जयवंत कोळी, मेडिकल असोसिएशनचे मनोज ठाकूर, पालवी, ठाकरे हॉस्पिटल व सरकारी रुग्णालयाची टीम आदीने सहकार्य केले. मात्र यावेळी नगरपालिका कर्मचार्‍यांची उपस्थितीची कमतरता जाणवत होती. तरी यापुढील लसीकरण मोहीम प्रसंगी नियोजन करणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.