हृदयविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन
सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूचा समावेश काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे, परंतु याआधीच या विषाणूच्या भीतीने व अफवांच्या बाजारात सामान्य नागरिकांच्या तसेच विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या मानसिक ताण तणावात वाढ झाली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, “गेली दोन वर्षे आपण कोरोना महामारीशी सामना करीत आहोत त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे मनोबल कुठेतरी कमकुवत झाले आहे यातच आता ओमिक्रॉन विषाणुच्या भीतीने जेष्ठ नागरिकांची झोप उडाली आहे त्यामुळे ज्या जेष्ठ नागरिकांना हृदयविकार तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे असे नागरिक वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांची भेट घेत आहेत.
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका कोणत्या वयोगटातील व्यक्तींना पोहचू शकतो, असे विचारले असता डॉ. तारळेकर म्हणाले यांनी सहव्याधीग्रस्त व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठांना यांना सोवध असणे महत्वाचे आहे. कोविडवरील लसचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांच्यासाठी कमी धोका आहे. संसर्ग झालाच तर अशा व्यक्तींमध्ये फारसी गंभीर लक्षणे दिसून येणार नाहीत. आतापर्यंत जगभरात आढळलेल्या ओमिक्रॉन बाधितांचा विचार केल्यास लसीकरण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नसल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.” ओमिक्रॉनची लागण होणार की नाही हे तुमच्या प्रतिकारशक्तीवर जास्त अवलंवून आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल आणि कोणतीही सहव्याधी नसेल तर या व्हेरिएंटची लागण होण्याची शक्यता कमी असेल तर प्रतिकारशक्ती कमी असेल, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, संधिवाताचा त्रास असेल तर संसर्गाचा अधिक धोका आहे, वयस्कर व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी कमी होत जाते त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. संजय तारळेकर यांनी दिला आहे.
नव्याने आलेला आणि अतिशय वेगाने फैलावत असलेला द. आफ्रिकेतून जगप्रवासाला निघालेला ओमिक्रॉन करोना विषाणू अगदी सौम्य स्वरूपाचा म्हणजे सुपर माईल्ड असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे त्यामुळे अफवांवर बिश्वास ना ठेवण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून केले आहे. कोरोनाचे नियम पाळणे तसेच बाहेर गेल्यावर फेसमास्क लावणे गरजेचे आहे.








Be First to Comment