जय अंबे नवरात्रोत्सव मंडळ पाले तर्फे आदिवासी महिलांना साड्या वाटप
सिटी बेल | उरण – पाले |
जगात खूप काही देण्यासारखं आहे जर आपल्या दातृत्वाने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर निखळ आनंद मिळत असेल तर ते दान केव्हाही श्रेष्ठ होय जेव्हा दुसऱ्या च्या प्रति अशी भावना असेल तेव्हाच अस कार्य घडतं असत. देणाऱ्या ने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे अंतिम ता देणाऱ्या चे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्या ची देण्याच्या प्रवृत्ती चे अनुकरण करावे या जगात जे दिन दुःखी अबला गरीब लोक हे कुणाच्या तरी मदतीची अपेक्षा करत असतात आणि अपेक्षित मदत ही गरिबांना पोहचविणे हे जणू आपले उद्दिष्टे समजून जय अंबे नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ पाले ने नवरात्री दुर्गा मातेला नऊ दिवसात भक्ती भावनेने नवसंसाने ज्या साड्या वाहिलेल्या असतत त्या आदिवसी महिला भगिनींना वाटप करण्याचा संकल्प केलेला पूर्ण केला आहे.


या मंडळाच्या संकल्प पूर्ती साठी मोलाची साथ ही आकाश फाउडेशन मुंबई च्या सेक्रेटरी डॉ संजीवनी ताई शृंगारे तसेच विनोद शृंगारे ,सारडे विकास मंच ,साइकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली व सुयश क्लासेस आवरे तसेच आकाश फाउडेशन, दिपमंदीर सोसायटी पुरस्कृत , कोप्रोली येथील आदिवसी वाडी येथे घरगुती वस्तु कपडे ,अन्न,धान्य ,लहान मूल,मुलींचे कपडे, स्वेटर, बेडशीट, टॉवेल, बूट चप्पल, खाऊ अश्या गरजेच्या वस्तू वाटप करण्यात आल्या. 80 ते 100 आदिवासी नागरीक यांनी सदर उपक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी या सामाजिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.

सदर प्रसंगी कोप्रोली आदिवासी वाडी च्या सदस्या बेबी बाई ,शनि बाई ,मनोहर कातकरी , सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे , साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील, सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड , रोहित पाटील, त्रिजन पाटील,रघुनाथ पाटील , अंगणवाडी सेविका वनिता मॅडम जय अंबे नावदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजित म्हात्रे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ म्हात्रे , खजिनदार चेतन पाटील व सर्व ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते.



कार्यक्रम चे सूत्रसंचालन निवास गावंड तर आभार प्रदर्शन अमर म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय अंबे ग्रुप च्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन आदिवाशी बांधवाना मदतीचा हात दिला.








Be First to Comment