Press "Enter" to skip to content

अलिबागमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य

सिटी बेल | अलिबाग | प्रतिनिधी |

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रत्येक पत्रकाराची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली होती. त्यानुसार रायगड प्रेस क्लब, अलिबाग प्रेस असोसिशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग मधील पत्रकारांची आरोग्य तपासणी
करण्यात आली.

यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागचे अध्यक्ष डॉ विनायक पाटील, डॉ कुमार जन्नावार मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ प्रशांत जन्नावार, डॉ अपूर्वा पाटील, नेत्रतज्ज्ञ डॉ समीर नाईक, दिशा पथोलोजी लॅबचे डॉ दीपक गोसावी यांनी पत्रकारांची तपासणी केली. यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष हर्षद कशाळकर, उपाध्यक्ष राजेश भोस्तेकर, कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.