सिटी बेल| खांदा कॉलनी |
स्व.संजय दिनकर भोपी यांच्या स्मरणार्थ खांदा कॉलनी मधील “आनंदी ग्रुप” आणि रोटरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक एकनाथदादा गायकवाड व श्रीखंडे यांच्या हस्ते तसेच आनंदी ग्रुपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता खांदेश्वर मंदिर परीसर, खांदा कॉलनी होणार आहे.
सदर कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या शिबिरास उपस्थित राहून रक्तदानाचे सामाजिक कर्तव्य पार पाडावे तसेच इतरांनाही रक्तदानास प्रोत्साहित करावे असे आवाहन कु.अभिषेक संजय भोपी ( अध्यक्ष – संजय भोपी प्रतिष्ठान, अध्यक्ष – सिद्धिविनायक मित्र मंडळ, उपाध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा पनवेल शहर ) यांनी केले आहे.








Be First to Comment