सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
राज्य पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदासाठी असलेल्या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळाल्याने रवींद्र बुधवंत यांना आज शुक्रवारी सायंकाळी निरोप देत वरिष्ठ निरीक्षक पदाचा कार्यभार सुनील पाटील यांनी स्वीकारला.
२०२०-२१ च्या सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अनेक पोलीस अधिकारी होते. कोरोनामुळे पदोनीती रोखण्यात आल्या होत्या. अखेर त्याला मुहूर्त लागल्याने उरण पोलीस ठाण्याचे रवींद्र बुधवंत यांना बढती मिळाल्याने नियंत्रण कक्षात असलेले सुनील पाटील यांच्याकडे उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे नेमणुकीचे आदेश नवी मुबंई पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी काढले.
त्यानुसार आज सायंकाळी बढती मिळालेले रवींद्र बुधवंत यांना निरोप देण्यात आला. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी अनेकांनी बढती मिळालेले रवींद्र बुधवंत व नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांचे राजकीय, सामाजिक व पत्रकारांनी अभिनंदन केले








Be First to Comment