जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य, 32 दात्यांनी केले रक्तदान
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व जिल्हा रुग्णलाय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ मधील अभ्यागत कक्षात हे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 32 जणांनी रक्तदान केले आहे.
दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात जागतिक अपंग दिन साजरा साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव ४७/३ संमत केला. या ठरावाचा उद्देश समाजातील सर्व बाबींमधील अपंग व्यक्तींच्या हक्क आणि कल्याणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. हा दिवस राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रत्येक बाबतीत अपंग व्यक्तींच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढविण्यासाठी नियुक्त केला गेला. कोविड महामारी व महाराष्ट्रात आगामी ओमायक्रोनचा धोका आहेच. तर रक्ताची गरज कायम असते. आजही रुग्णनासाठी रक्तची कमतरता कायम भासत असते. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधत आज रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीत करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी पत्रकार अमूलकुमार जैन यांनी प्रथम रक्तदान केले. त्यांनी 15 ऑगस्ट1997 रोजी प्रथम रक्तदान केले होते.तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी 53 वेळा रक्तदान केले आहे. त्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी,दिव्यांग सल्लागार किशोर वेखंडे यांनी कौतुक केले.राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य अलिबाग शासकीय रक्त केंद्र, जिल्हा रुग्णलाय सिव्हिल ब्लड सेंटर यांच्या वतीने डॉ. सौरभ गावंड, तंत्रज्ञ पूनम पाटील, परिचारिका तेजस्विनी घासे, फरीद अफवारे यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.








Be First to Comment