सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
चौक ग्रामीण रुग्णालयामार्फत मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन जागतिक एड्स दिनानिमित्त वावोशी या ठिकाणी आय.सी.टी.सी विभाग ग्रामीण रुग्णालय , चौक ,आधार संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.यावेळी भाटे राजे साईड वर १२५ कर्मचारी व अधिकारी यांची एच.आय.व्ही.एड्स चाचणी करण्यात आली.

समुपदेशक अशोक लोंढे यांनी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही.एड्सची कारणे लक्षणे ए.आर.टी उपचार पद्धती व टी.वी. ची कारणे लक्षणे उपचार पद्धती आजारांविषयी माहिती दिली . आधार हॉस्पीटल पनवेल मार्फत १२५ कर्मचारी व अधिकारी यांची शुगर व बी . पी.तपासण्यात आली .
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय समुपदेशक अशोक लोंढे, लॅब टेक्नीशीयन विकास घुमरे, आधार संस्थेच्या मेघा मॅडम, भगवान सावंत,भाटे राजे साईडचे स्वप्नील पाटील,आधार हॉस्पीटल पनवेल सदस्य यांचे , विशेष असे सहकार्य लाभले.








Be First to Comment