Press "Enter" to skip to content

समर्थ नेत्रालयाच्यावतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिकांसाठी गेल्या काही वर्षांपासून मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालय यांच्यावतीने परिसरात मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते.रसायनी व आसपासच्या परिसरातील वावेघर,सावळा,लाडिवली, माजगाव आंबिवली,आपटा, लोधिवली, ठोंबरेवाडी,भिंगारवाडी,भोकरपाडा,पोयंजे आदी ठिकाणी डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याअगोदर घेण्यात आले आहे.

सध्याच्या युगात डोळ्यांचे आॅपरेशन करणे परवडत नसल्याने मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाकडून सवलतीत सहकार्यं केले जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

वावेघर येथील श्री गणेश मंदिराच्या सभागृहात मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाच्यावतीने वावेघर ग्रामपंचायत सरपंच विजय चव्हाण,माजी सरपंच गुरुनाथ माळी यांच्या सहकार्याने मोतिबिंदू आजार असणा-यांसाठी सवलत देण्यात आली.यात रक्ततपासणी मोफत, औषधे व आयड्राप मोफत,लेजरव्दारे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, आॅपरेशन पुर्व व नंतर तपासणी मोफत, मोतिबिंदू आॅपरेशन चार्जेस मोफत असून फक्त लेन्स व आॅपरेशन सामान याचे अत्यल्प शुल्क घेतले जाणार असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ विशालाक्षी शेडबाले यांनी सांगितले.

वावेघर येथील शिबिरात परिसरातील 157 नागरिकांनी डोळे तपासणी केली.यात 43 नागरिकांना मोतीबिंदूचा आजार असल्याचे दिसून आले.त्यांच्यावर सवलतीच्या दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ.विशालाक्षी शेडबाळे यांनी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.