सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारतीय जनता पार्टी कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात कोव्हीड -19 प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.110 जणांचे लसीकरण करून घेतले.
कोव्हीशिल्ड लसीचा पहिला आणि दुसऱ्या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 8 सप्टेंबर रोजी जनसेवा कार्यालयात ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्याचे 84 दिवस पूर्ण झाले त्यांना दुसरा डोस वेळेत मिळावा ओमीक्रॉन चा संभाव्य धोका लक्षात घेऊन गर्दी टाळावी या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले होते. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

110 लोकांचे लसीकरण करण्यात आले तसेच अभिनव शाळे जवळील 80 वर्षीय जोशी काकु यांचे घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.पहिल्या डोसचे 84 दिवस पुर्ण झाल्यावर 85 व्या दिवशी शिबिर आयोजन करून सर्व पहिल्या डोस झालेल्या नागरिकांना फोन करून बोलावुन लसीकरण करून घेण्यात आले.
याप्रसंगी सुनिल गोगटे, राहुल मसणे, स्नेहा गोगटे शर्वरी कंबळे, डॉ.मनोज बनसोडे, डॉ संगीता दळवी, सर्वेश गोगटे, पूनम डेरवणकर, सोनिया गरवारे उपस्थित होते.








Be First to Comment