सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त श्री समर्थ सामाजिक संस्थेअंतर्गत कोरोना नियमांचे पालन करुन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थी पद रैली व परिसरातील शाळांमधील 8 वी ते 12 वी मधील किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्याख्यानामार्फत एड्स-कोरोना बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
दरवर्षी परिसरातील गावांमध्ये पथनाट्च्या माध्यममाद्वारे जागृति करण्यात येत असते परंतु यावेळी ‘ओमिक्रोन’विषाणुचे संकट विचारात घेता गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
यावेळी जास्तीत जास्त किशोरवयींन मुलांना जागृत करण्याचा संस्थेचा मानस आहे.
आज डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एड्स व कोरोना आजारा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी किशोरवयीन होणारे शारीरिक ,मानसिक बदल यावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधुन एड्स आजारा बद्दलची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.परिसरातील सर्व शाळांमध्ये ही जागृती करण्यात येणार आहे.
जागतिक एड्सदिन 2021 ची थीम “असमानता समाप्त करा. एड्स संपवा आणि महामारी संपवा”, मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून. WHO ने असे म्हटले आहे की या वर्षीचा मुख्य अजेंडा जगभरातील आवश्यक HIV सेवांमध्ये वाढती असमानता अधोरेखित करणे हा आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की मानवी हक्कांबद्दलची विभागणी, असमानता आणि दुर्लक्ष हे अशा अपयशांपैकी एक आहेत ज्यामुळे एचआयव्ही हे जागतिक आरोग्य संकट बनू शकले आणि राहू दिले. WHO हे देखील जोडते की आता COVID-19 असमानता वाढवत आहे आणि सेवांमध्ये व्यत्यय आणत आहे, ज्यामुळे HIV सह जगणाऱ्या अनेक लोकांचे जीवन अधिक आव्हानात्मक बनले आहे.
यावर्षी, WHO आणि AIDS संघटना जागतिक नेत्यांना आणि नागरिकांना एड्सला कारणीभूत असणा-या असमानतेचा सामना करण्यासाठी आणि ज्यांना सध्या आवश्यक HIV सेवा मिळत नाहीत अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती चे आवाहन केले आहे.
जागतिक एड्स दिनाच्या ह्या कार्यक्रम डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथील सर्व शिक्षक वर्ग आणि बिर्ला कार्बन इंडिया लिमिटेड यांचे सहकार्य मिळाले.








Be First to Comment