Press "Enter" to skip to content

माजी मंत्री स्व.प्रभाकर मोरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन व विस्तार कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी महाड येथील जनकल्याण रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिराला शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख, सचिव अशोकबंधू देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे,तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.वसंत डोंगरे, प्रा. डॉ. जयश्री जाधव-पाटील, प्रा. शैलेश जाधव,प्रा.डॉ. राम बरकुले तसेच आजीवन अध्ययन विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नाथीराम राठोड व प्रा.मनोज भगत यांनी सर्वांचे स्वागत केले. सदर शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. पल्लवी साळुंखे यांनी काम पाहिले, तर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी श्री दिपक पवार, रक्तपेढीचे संचालक व महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर बुटाला व अन्य स्टाफ व तंत्रज्ञांनी शिबिरासाठी विशेष योगदान दिले.

सदर रक्तदान शिबिराला पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी सदिच्छा भेट देऊन स्व.प्रभाकर मोरे यांना अभिवादन करून रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.या रक्तदान शिबिराद्वारे 25 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक रावेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.