Press "Enter" to skip to content

चोळई येथील मोरे महाविद्यालयामध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

येत्या मंगळवार, दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकरजी मोरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सकाळी 9 वाजता महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी इच्छूकांनी रासेयो अधिकारी प्रा.डॉ. जयश्री जाधव -पाटील 9284194453, प्रा.डॉ.वसंत डोंगरे 8208147689, प्रा.डॉ.नाथीराम राठोड 9272585815, प्रा.मनोज भगत 7507285039 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.