खुशखबर ! माथेरान मध्ये लवकरच धावणार “ई रिक्षा”
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
हातरीक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे आणि त्यातूनच आता ई रिक्षा या महत्वकांक्षी प्रकल्पाला शासनाकडून जवळजवळ हिरवा कंदील मिळालेला आहे.
माथेरान मध्ये आजपर्यंतच्या कार्यकाळात पर्यटकांना वाहतुकीसाठी हातरीक्षा आणि घोडे हीच वाहने वापरली जात आहेत. परंतु जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना याच ठिकाणी अद्याप वाहतुकीच्या सुविधेत काहीच बदल घडवून आणला गेला नव्हता त्यातच अत्यंत कष्टदायक श्रम करणाऱ्या हातरीक्षा चालकांची या गाड्या ओढताना खूपच दमछाक होत असते.
त्यांना या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी आणि याच माध्यमातून इथे पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्यास निसर्गाच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो जंगलाचे संवर्धन होण्याची गरज असताना आणि इथे फिरावयास येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना सुध्दा मनमोकळे पणे फिरता यावे यासाठी आता इथे वाहतुकीसाठी ई -रिक्षा हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहिला आहे याकामी हातरीक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे आणि त्यातूनच आता या महत्वकांक्षी प्रकल्पाला शासनाकडून जवळजवळ हिरवा कंदील मिळालेलाच आहे.
त्यामुळे अल्पावधीतच इथे पर्यटकांच्या सेवेसाठी ई रिक्षाची सुविधा उपलब्ध होणार आहे या सुविधेमुळे कुणाच्याही व्यवसायावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याने आता मूळवासीय अश्वपाल संघटनेचे उपाध्यक्ष संतोष आखाडे यांनी नुकताच दि. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन सादर करून ईथल्या एकूण ४६० घोडे आणि ९४ हातरीक्षा यांनाच यामध्ये सामावून घेण्यात यावे. अन्य कुणालाही सहसा प्राधान्य देण्यात येऊ नये.अन्यथा कुणीही हॉटेल धारक खाजगी स्वरूपात या रिक्षा आणू शकतात त्यामुळे इथल्या ई रिक्षा चालकांच्या व्यवसायावर भविष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो.
या रिक्षांची संख्या सुध्दा मर्यादित ठेवण्यात यावी जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही, कुठेही पार्किंगची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे दिलेल्या निवेदनात संतोष आखाडे यांनी नमूद केले आहे.मुळवासी अश्वपाल संघटनेच्या निर्णयाचे सर्वच स्तरांतुन स्वागत होत आहे.
एमएमआरडीए यांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येत आहेत त्यामुळे रस्त्यावर आपसूकच स्वच्छता राखली जाणार आहे कुठल्याही प्रकारच्या दुर्गंधीचा अथवा धुळीचा त्रास सोसावा लागणार नाही.या धुळीमुळे मालाचे नुकसान होणार नसल्याने
ज्ञानेश्वर बागडे — व्यावसायिक माथेरान
ई – रिक्षा सारखी विकसनशील साधने माथेरान मध्ये सुरू होणे ही काळाची गरज बनलेली आहे.आम्हाला काहीही करून आता इथे बदल हवा आहे. यासाठी जे साथ देतील त्यांना सोबत घेऊन आणि जे कुणी नसणार त्यांच्या शिवाय ही वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे आता शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सहज शक्य होईल यात शंकाच नाही.
माथेरान शहरात पर्यटकांकरिता दळणवळण सुविधा देण्याकरिता ई रिक्षा लवकरच सुरू होणार आहे ही खरोखरच आनंदाची बाब आहे. शासकीय रस्त्यावर इ रिक्षाला परवानगी देण्यात येणार आहे असे समजते परंतु येथील गरीब लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटकांवर अवलंबुन आहे तो आबाधित राहण्याकरता आपण येथील परवानाधारक रिक्षा व घोडेवाले यांनाच इ रिक्षासाठी प्राधान्य देण्यात यावे या व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक किंवा खाजगीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी.
राकेश कोकळे –अध्यक्ष धनगर समाज तथा अश्वपालक माथेरान
सुनील शिंदेंनी ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत अशा महत्वाच्या प्रत्येक चांगल्या कामात अडथळे हे येत असतात,आणि याचा माथेरानकरांना चांगलाच अनुभव आहे.त्यामुळे शिंदेंनी ह्या अडथळ्यांची पर्वा न करता हे प्रयत्न चालू ठेवा,तुमच्या कार्याला नक्कीच यश येणार,ज्यांना पर्यटन क्रांती हवी आहें अशा सर्व माथेरानकराचा यास पूर्णपणे पाठींबा राहणार आहे.शासनाने लवकरच इथे ई रिक्षा सुरू करून या गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा.
निखिल शिंदे — लॉज धारक माथेरान











Be First to Comment