Press "Enter" to skip to content

अलिबाग शहरातील श्रीबाग येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीने आणि अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील श्रीबाग नंबर २, म्हाडा कॉलनी, पारिजात सोसायटी,रायवाडी ,चेंढरे येथील नागरिकांसाठी कच्ची भवन श्रीबाग 2 येथे दिनांक – 28/11/ 2021 सकाळी 9.30 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधूमेह तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आली आहे. राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अलिबाग मुरूड आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना रायगड संपर्क प्रमुख विलासजी चावरी , सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे , कामगार नेते दीपक रानावडे, अलिबाग विधानसभा संघटक सतीश पाटील, तालुका प्रमुख राजाभाई केणी, माजी शहरप्रमुख अर्जुन पाटील, महिला आघाडीच्या जितेंश्री पाटील , महिला शहर संघटीका तनुजा पेरेकर , उपशहर महिला संघटीका रंजिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी अलिबाग शहरातील सर्व शाखाप्रमुख, उपशहर प्रमुख, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.