सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
मुंबई, नवी मुंबई, कोकण परिसरात कराडी समाज मोठ्या प्रमाणात असून येथील विकासात कराडी समाजाचे मोठे योगदान आहे. कराडी समाजाचे प्रश्न, समस्या सोडविणारी ‘अखिल कराडी समाज’ ही राष्ट्रीय स्तरावर संघटना कार्यरत आहे.या ‘अखिल कराडी समाज’ या संघटनेची मिटिंग उरण तालुक्यातील पागोटे या गावात घेण्यात आली .या मिटींगमध्ये गाव कमिटीचे पदाधिकारी, कराडी समाज उरण तालुका युवक संघटनेचे सदस्य, अखिल कराडी समाज महाराष्ट्र युवक संघटनेसाठी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गाव कमिटी पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष नरेश जनार्दन भोईर,उपाध्यक्ष माणिक महादेव पाटील,सेक्रेटरी सुजित काशिनाथ पाटील, खजिनदार नरेश काशिनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर कराडी समाज उरण तालुका युवक संघटना सदस्य पदी नितीन प्रकाश पाटील, विनोद कान्हा पाटील, सुजित काशिनाथ पाटील, कुणाल अरुण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अखिल कराडी समाज महाराष्ट्र युवक संघटना सदस्य पदी भारत वासुदेव पाटील, अनिल प्रभाकर पाटील, प्रेम दिलीप पाटील, अरुण महादेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व नवनियुक्त सदस्यांचे पदाधिकार्यांची निवड बिनविरोध झाल्याने नवनियुक्त सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अखिल कराडी समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महादेव बंडा, विलास पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.







Be First to Comment