Press "Enter" to skip to content

उरणकरांना उपविभागीय अभियंताची नितांत गरज

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय उरण येथे कायम स्वरूपी उपविभागीय अभियंताची नेमणूक करण्याची मागणी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय उरण येथे कायमस्वरूपी उपविभागीय अभियंता नसल्याने नागरिकांची तसेच सार्वजनिक बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यक्तीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उपअभियंताची नेमणूक उरणला होत नसल्याने उरण मधील नागरिकांना विविध समस्यांना, प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या अनेक समस्या प्रश्न प्रलंबित राहत आहेत त्यामुळे येथे कायम स्वरूपी उपविभागीय अभियंताची नितांत गरज आहे.तसेच उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विकास कामांमध्ये स्थानिक स्थापत्य अभियांत्रिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.जनतेच्या या भावना लक्षात घेत याबाबत पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेचे उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथे कायमस्वरूपी उपविभागीय अभियंताची कायम स्वरूपी नेमणूक करण्यात यावी.तसेच उरण सार्वजनिक बांधकाम विभागात होणाऱ्या विकास कामांमध्ये स्थानिक स्थापत्य अभियांत्रिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख विनोद प्रभाकर म्हात्रे यांनी राजाराम गोवारी-अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन, बेलापूर,यांच्याकडे पत्रव्यवहारा द्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.