सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
दरवर्षी प्रमाणे यंदाही वहाळ ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पायी दिंडीची सुरुवात शाळेतून, हनुमान मंदिरातून करण्यात आली. नंतर या पायी दिंडीचे आगमन श्री साई देवस्थान वहाळ येथे झाल्यावर संस्थापक रवींद्र पाटील यांनी दिंडी चे स्वागत केले.
यावेळी दिंडीने मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासास मार्गस्थ केले. यावेळी साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. पार्वती पाटील, जगन पाटील आदीउपस्थित होते. यावेळी दिंडीतील भाविकांचे व दिंडीचे अध्यक्ष गोविंद महाराज व कार्याध्यक्ष महंत रामकृष्ण महाराज यांचे साई देवस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. कोविड मुळे 2 वर्ष खंड पडलेल्या दिंडीने यंदा पुन्हा सुरुवात केली आहे. यावेळी भाविक भक्त मोठ्या उत्साहात दिंडीसाठी निघाले होते.
Be First to Comment