सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग तहसिलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग तहसिल कार्यालय येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन अलिबागच्या तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.श्री. हुलवान, लायन्स क्लब, श्री. जित टोळकर, निवासी नायब तहसिलदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची रक्तदाब, मधुमेह, दातांचे आरोग्य, थायरॉईड व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली.








Be First to Comment