सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
हैदराबाद येथे दिनाकं 17 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत साईराज जगदीश भोईर या नवीन शेवेयेथील उदयमुख खेळाडूने फर्स्ट रँक 120 प्लस कॅट्यागिरी मध्ये एकूण 628 किलो वजन उचलून गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच गेल्या महिन्यात साईराज भोईर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले होते. त्याच्या उत्तम कामगिबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कु साईराज यास पुढील वाटचालीस शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.

यावेळी साईराजचे वडील जगदीश भोईर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक अमित भगत व भुपेंद्र भोईर उपस्थित होते, तसेच साईराज याचे नगरसेवक अतुल ठाकूर, विधी सेलचे तालुका अध्यक्ष मच्छिद्र घरत, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील व मानिराम पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment