Press "Enter" to skip to content

एसटी संपामुळे आता राज्यातील जनता वेठीस

दुटप्पी भाजपाने आगीत तेल ओतल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळला – महेंद्र घरत

सिटी बेल | पनवेल |

राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी यांनी केलेल्या संपामुळे आता राज्यातील जनता वेठीस धरली जाऊ लागली आहे. या संपाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत म्हणाले की, दुटप्पी भूमिकेतील भाजपा नेत्यांनी या संपाला चिथावणी दिल्यामुळे संप चिघळला आहे.

याबाबत अधिक सविस्तर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. तत्कालीन परिवहन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की राज्य परिवहन मंडळाचे विलीनीकरण होऊ शकत नाही. आज त्याच पक्षातील नेते राज्य महामंडळाचे विलीनीकरणासाठी आग्रही आहेत. अशी दुटप्पी भूमिका घेऊन भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला चिथावणी देत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या सुरुवातीला एक कामगार नेता या भूमिकेतून मी पनवेल-उरण डेपोतील कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा देखील दर्शविला. तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देखील राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी एकदम सगळ्या मागण्या मान्य होणे कुठल्याही संपाच्या वेळी शक्य नसते. महा विकास आघाडीतील एक घटक पक्ष या भूमिकेतून निश्चितच सुवर्णमध्य साधून हा संपल लवकरात लवकर मिटविण्यासाठी आम्ही आग्रही होतो. परंतु भाजपाच्या नेत्यांनी उलट-सुलट बयान बाजी करून,कोर्टाची पायरी चढायला लावून, मंत्र्यांच्या घरावरती हल्ले करायला लावून या संपाला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे हे कदापि उचित नाही.

आम्ही कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना त्यांचे न्याय्य हक्क हे मिळालेच पाहिजेत. महामंडळ नफ्यात नाही म्हणून त्याचे खासगीकरण करणे योग्य होणार नाही. परंतु ज्या भाजपाच्या नेत्यांना या महामंडळ कर्मचाऱ्यांचा पुळका आला आहे त्यांचे राष्ट्रीय नेते मात्र सगळे सरकारी प्रकल्प सरसकट विकायला काढत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.