Press "Enter" to skip to content

अखेर… झोपलेले वाहतूक पोलीस झाले जागे !

भर रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहानांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

भर रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहानांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी अशा वाहानांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

उरण-पनवेल व जेएनपीटी महामार्गावर अवजड कंटेनर, ट्रेलर भ्ररस्त्यावर पार्किंग केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. याची दखल उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी घेत.
अशा वाहनांवर वाहतुक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अवजड वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यामध्ये पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील एल डी टोलनाका, धुतुम, आयओटीएल सह अन्य महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील महामार्ग मोकळे होऊ लागले आहेत. ही कारवाई उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, संजय पवार, संजय जाधव, शेंडे, निता डाऊर, विशाल भिसे या वाहतूक पोलिस पथकाने उरण तालुक्यातील रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.