सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
शिवसेना शाखा सावळे व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय शेडुंग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सावळे येथे ज्ञानवर्धनी माध्यमिक शाळा सावळे येथे करण्यात आले होते.तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्दी, खोकला, ताप ,मलेरिया, डेंगू, हाडांचा आजार, गुडघेदुखी कंबरदुखी, शुगर ,ऑक्सिजन लेवल ,त्वचारोग ,मासिक पाळीचे उपचार आदी उपचार व योग्य सल्ला देण्यात आला .परिसरातील 95 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला डॉ श्री आर शिरसागर व जयदास जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच प्रशांत माळी, देवलोलीचे माजी सरपंच जयदास पाटील, शिवसेना गुळसुंदे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी, पनवेल तालुका महिला उप संघटिका संगिता भांडारकर, गुलसुंदे विभाग महिला संघटिका -श्रीमती नूतन पाटील, जेष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे, शाखाप्रमुख- ह.भ.प.श्री सुदर्शन मते, ह.भ.प.भाऊ मते, डॉ क्षिरसागर, डॉ जाधव,व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.








Be First to Comment