Press "Enter" to skip to content

हातभट्टी दारु विकणारे गजाआड

बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारु विक्री करणार्‍या विरोधात कारवाई

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु विना परवाना ताब्यात ठेवल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

तालुक्यातील दिघाटी येथील एका घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत दोघेजण गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशीररित्या जवळ बाळगून असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.तुकाराम कोरडे, पो.उपनिरीक्षक गजानन टाकळे, पो.नाईक प्रमोद घुले आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेवून तेथून जवळपास 1 हजार किंमतीची गावठी दारु हस्तगत केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.