प्रकल्पग्रस्तांचे रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात आंदोलन तोडगा न निघाल्याने चिघळले : आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला.

प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन केले होते. रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीने कडसुरे येथे जनआंदोलन छेडण्यात आले. सोमवारी सायंकाळ पर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले, यावेळी पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांची धरपकड करण्यात आली. या आंदोलनात शिहू चोळे नागोठणे विभागातील प्रकल्पग्रस्त, वंचित बहुजन आघाडीचे रायगड सह राज्यातील नेते, पदाधिकारी यांनी रिलायन्स विरोधात एल्गार पुकारला.











Be First to Comment