Press "Enter" to skip to content

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

जाणता राजा प्रतिष्ठान तर्फे आयोजित किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व आकाश कंदील बनवणे स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |

जाणता राजा प्रतिष्ठान-पागोटे उरण यांच्या माध्यमातून दिपावली निमित्त गावात गड किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा तसेच आकाश कंदील बनवणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पागोटे गावातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या स्पर्धांसाठी मिळाला.

जाणता राजा प्रतिष्ठाण पागोटेचे संस्थापक व अध्यक्ष विवेक पाटील यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी पागोटे गावातील माजी सरपंच योगेश पाटील व माजी उपरपंच सुमित पाटील, शिवसेना उपशाखा प्रमुख महेश पाटील व विषेश कार्यकारी शिवसेना रमेश धर्मा पाटील, जेष्ठ नागरीक मूग पाटील गुरुजी व जाणता राजा प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक-सायली सुमित पाटील,द्वितीय क्रमांक-कु.प्रणाली पंढरीनाथ पाटील,तृतीय ममता रवींद्र भोईर
उत्तेजनार्थ-प्राजक्ता प्रशांत पाटील
तर गड किल्ले बांधने स्पर्धेत
प्रथम क्रमांक-जाणता राजा ग्रुप पागोटे,द्वितीय क्रमांक-अर्चित हेमंत पाटील,तृतीय क्रमांक ओम योगेश पाटील,उत्तेजनार्थ-क्रिश राजेश ठाकूर तर आकाश कंदील बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक-महेश साहेबराव मगर,
द्वितीय क्रमांक-यज्ञा नरेंद्र तांडेल,
तृतीय क्रमांक-हिताली सुजित तांडेल,उत्तेजनार्थ-आराध्य विवेक पाटील यांनी पटकाविले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम दुर्गादेवी मंदिराच्या सभामंडपात पागोटे येथे पार पडला.या स्पर्धेचे पारितोषिके पागोटे गावचे उद्योजक सुजित तांडेल यांच्या माध्यमातून देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.