Press "Enter" to skip to content

गव्हाण ग्रामपंचायतीत शिबीर

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली गव्हाण ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

जनसेवा हीच ईश्वर सेवा – जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

गव्हाण विभागात प्रथमच गव्हाण विभागीय कॉंग्रेस कमिटी व यमुना सामाजिक शिक्षणिक संस्था, शेलघर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गरिब व गरजू लोक या शिबिरात येवून चेष्मा घेवून जातांना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे जनसेवा हीच ईशवर सेवा असे आम्ही मानत आहोत. पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठे अशा आरोग्य शिबीराच आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन महेंद्र घरत यांनी केले.

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या संकल्पनेतुन व माजी सरपंच वसंतशेठ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत. सदर शिबीरात तज्ञ डॉक्टराकडून डोळे तपासणी करून मोफत ४२१ चष्म्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना काळात दवाखाण्यात मोठया प्रमाणात रक्ताचा तुटवाडा भासत आहे आणि या काळातचं रक्तपेढीमध्ये जास्त रक्त साठा झाला नाही. त्यामुळे अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आपण एकदा केलेल्या रक्तदानामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे. यावेळी अनेकांनी रक्तदान केले.

सदर शिबीरात दमा, मधुमेह, सि.बी.सी, कॉलेस्ट्रॉल, क्रिएटीनीन, डोळे तपासणी या सर्वांना तज्ञ डॉक्टराकडून सल्ले देण्यात आले. हे शिबीर यमुना सामाजीक, शैक्षणिक संस्था शेलघर व गव्हाण विभागीय कॉंग्रेस कमिटी यांच्या सयुक्त विद्यमाने, लायन्स कल्ब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडलं.

या शिबिरासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, लायन दिनेश अग्रवाल, लायन विमल कालरा, रा. जि. महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. श्रद्धा ठाकूर, रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर दीपाली पाटील, सौरभ पाटील, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व गव्हाण विभागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.