Press "Enter" to skip to content

गणपतीची स्थापना

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये गणपती बाप्पा विराजमान

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांना गणेशाचे दर्शन होण्यासाठी गणरायाची वाजत गाजत स्थापना करण्यात आली.

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे हजारो वृक्षाची लागवड आणि संगोपनानंतर अनेक संकल्पना सत्यात उतरवत आज येणाऱ्या पर्यटकांना नतमस्तक होण्यासाठी या पार्कमध्ये इन्टरपोर्ट ग्लोबल प्रा. लि. चे इम्पोर्ट मॅनेजर श्री अमोल तेली यांनी कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिल्या नंतर ५००० रु या पार्क साठी दिले होते त्याचा योग्य वापर करत आज आई एकविरा बिट्स सारडेचे भालचंद्र पाटील यांच्या बँड पथकाने वाजता गाजत या बापाची गावातून मिरणूक काढत या बापाची भटचीच्या हस्ते पूजन करून स्थापना करण्यात आली.

यासाठी लोखंडी स्टँड लावून त्यावर हा बाप्पा विराजमान केला आहे यासाठी मेहनत ही सारडे विकास मंचचे कार्याध्यक्ष रोहित पाटील सोबतीला त्रिजन पाटील यांनी घेतली आहे. या मुरवणुकी प्रसंगी या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे 65 वयाचे श्री रामदास हरी म्हात्रे हे रोजच या पार्कमध्ये काही ना काही काम करत असतात त्या रामदास म्हात्रे तसेच सौ देवकूबाई रामदास म्हात्रें यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी साई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश पाटील सर , माजी सरपंच वशेणी प्रसाद पाटील, संदेश पाटील, महेश पाटील, सचिन पाटील, दौलत भोईर, कार्याध्यक्ष रोहित पाटील, त्रिजन पाटील, प्रितेश म्हात्रे, हितेश म्हात्रे, भुषण म्हात्रे, मंगेश पाटील, नितेश पाटील, हर्षद म्हात्रें, सिद्धेश पाटील, प्रथमेश पाटील, रसिक पाटील, अंश पाटील, तसेच सौ पुष्पां म्हात्रें,स्नेहा पाटील रूपाली म्हात्रें,कल्पना पाटील तसेच बचे कंपनी आदीच्या उपस्थित गणपती बापा कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये विराजमान झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.